कामठी, महाराष्ट्र: 'नूगा बेस्ट' मोफत थेरपी सेंटरचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मॅनेजिंग डायरेक्टर श्री. गिरधारी सर यांच्या उपस्थितीत, या सोहळ्यात २०० हून अधिक नागरिक सहभागी झाले.
रनाळा परिसरातील ‘नूगा बेस्ट’ मोफत थर्मल थेरपी सेंटरचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘नूगा बेस्ट इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक गिरधारी सर यांनी विशेष उपस्थिती लावली.
सेंटरमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला परिसरातील सुमारे २०० हून अधिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची उपस्थिती होती.गेल्या वर्षभरापासून हे सेंटर स्थानिक नागरिकांना मोफत थेरपी सेवा देत आहे. यावेळी गिरधारी सर यांनी आरोग्याचे महत्त्व विशद केले आणि सेंटरच्या सेवा कार्याचे कौतुक केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वर्धापन दिन सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.
नागपूर: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) मुख्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
वनबाला गाडी, १९७८ मध्ये स्थापन झालेली, आज नागपूरच्या जंगलात बंदिस्त आहे. या गाडीने अनेक वर्षे शहरातील मुलांना आनंद दिला, परंतु आज तिची अवस्था चिंताजनक आहे.
नागपूरच्या प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात ५००१ दीपांच्या प्रकाशात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आकर्षक रांगोळ्या आणि ३० फुटांचा स्वस्तिक सजविला जाणार आहे.