नागपूर:
पंच परिवर्तन कृती समितीतर्फे उत्तर अंबाझरी मार्गावरील हडस हायस्कूलसमोर फुटपाथवरील गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात युवा उद्योजक जय अग्रवाल व संदीप अग्रवाल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
समाजसेवक संजय बंगाले यांनी यावेळी गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी उपस्थितांना या योजनांची माहिती दिली व त्यांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला.कार्यक्रमात ॲड. अविनाश काळे यांनी उपक्रमाची माहिती दिली. संजय शहाणे यांनी हनुमान चालीसेचे गायन करून उपस्थितांचे मनोबल वाढवले. मधुकर देशकर यांनी आभार मानले.या उपक्रमात विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते, ज्यांनी या उपक्रमाला समर्थन दिले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.



