नागपूर

 इंद्रधनू विकलांग सेवा संस्था, राणाप्रतापनगरतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. १ व २ सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भारत मूकबधिर, कल्याण मूकबधिर, अंध विद्यालय, स्नेहांगण तसेच सावनेर मूकबधिर निवासी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना राखी बांधली व खाऊचे वाटप केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी व कथा सादर करून आनंद व्यक्त केला. संस्थेच्या अध्यक्ष कविता लंके यांनी झाडे आपल्याला प्राणवायू देतात, तर जवान देशाचे रक्षण करतात. त्यामुळे झाडे व जवानांनाही राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले. सावनेर येथील विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून या संदेशाला प्रतिसाद दिला.कार्यक्रमाला इंद्रधनू संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.