लाल बहादुर शास्त्री हिंदी माध्यमिक व प्राथमिक शाळा, मनपा ,हनुमान नगर येथे ३० जून 2026 रोजी प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात व विद्यार्थ्यांच्या भरागतच उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 31 चे नगरसेवक श्री गणेश चर्लेवार ,श्री चंद्रकांत खंगार ,नगरसेविका मंगला मस्के , मानसीता  सिमले यांची प्रमुख उपस्थिती होती.

हनुमान नगर झोन क्रमांक 3 चे सह आयुक्त श्री बावनकर, झोन सभापती ज्योती देवघरे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकर, माजी मुख्याध्यापिका  कनाठे , माजी प्राथमिक मुख्याध्यापिका येवले या सुद्धा उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका  जयसिंघानी व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ .माळवी तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. मान्यवरांच्या हातून विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

तसेच याप्रसंगी वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वनिता काळे यांनी केले व आभार प्रदर्शन संध्या थोटे यांनी केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाखाणण्यासारखी होती !