कामठी,

 श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ निमित्त फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI), नवी दिल्ली यांच्या प्रायोजकत्वाखाली विज्ञान-चित्रकथा (Scitoon) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.


‘निरोगी भारत : रोगाणुरोधी प्रतिरोधाविरुद्ध लढा’ हा स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत ५५ संघांमधील सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी चित्रे व कार्टूनच्या माध्यमातून प्रतिजैविकांचा योग्य वापर, औषध सुरक्षा, लसीकरण आणि संसर्ग प्रतिबंध याबाबत जनजागृती केली.मौलिकता, वैज्ञानिक अचूकता, कल्पकता आणि सादरीकरण या निकषांवर स्पर्धेचे मूल्यांकन करण्यात आले. विजेत्यांना स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि आरोग्यविषयक जनजागृती वाढविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.