नागपूर :
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) मुख्यालयात राजभाषा पंधरवडा-२०२६ अंतर्गत २५ सप्टेंबर रोजी स्वनिर्मित काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. कर्मचाऱ्यांनी विविध विषयांवरील कविता भावपूर्ण व प्रभावी शैलीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज कुमार पांडेय आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रवीण डबली उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक सिंह चौहान यांनी केले. राजभाषा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.



