नागपूर,
राजे रघुजीनगर येथे कृती थिएटर अँड स्पोर्ट्स अकादमीतर्फे लहान बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अनंता पवार व शारदा पवार यांच्या सहकार्याने करण्यात आले. बालकांनी विविध आकर्षक वेशभूषा करून या उत्सवात सहभाग घेतला.
यावेळी संस्थेचे सचिव अशोक माटे यांनी बैल पोळ्याचे महत्त्व व शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलांचे योगदान याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. शारदा अनंता पवार यांनीही याबाबत विचार व्यक्त करताना सांगितले की, बैल हा शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.संस्थेच्या अध्यक्ष शीतल दोडके यांनी बैल पोळ्याच्या माध्यमातून शेतकरी व बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते जपले जाते, असे सांगितले. या उपक्रमासाठी विजय पवार, आरती पवार व तनुश्री पवार यांनी विशेष सहकार्य केले. बालकांमध्ये पारंपरिक सण व संस्कृतीविषयी जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



