म्हाळगी नगर गजानन नगर येथील नागरिकांनी मलवाहिनी व सांडपाणी खोदकामाला विरोध दर्शवला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या रस्त्यांवर खोदकामामुळे विनाकारण त्रास होईल.
म्हाळगी नगर–गजानन नगर परिसरात मलवाहिनी व सांडपाणी वाहिनीसाठी सुरू असलेल्या खोदकामाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे नुकत्याच बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांचे नुकसान होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या वाहिनीमुळे कोणतीही समस्या उद्भवलेली नसताना नवीन लाईनसाठी रस्ते फोडण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी या कामामुळे होणारी गैरसोय आणि सार्वजनिक निधीतून बांधलेल्या रस्त्यांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दीपक शेंडेकर, नथ्थूजी कोहळेकर, रमेश शेळके, गणेश घाटे, योगेश कारेमोरे, धनराज बालपांडे, ज्ञानेश्वर ठवकर, नथुजी जांभळे, शिवाजी इंगोले, रमेश तांदळे आणि केशव चुटके यांच्यासह स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे लोकप्रतिनिधींकडे या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी केली आहे.नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने खोदकामाबाबत पुनर्विचार करावा आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
नागपूर: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) मुख्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
वनबाला गाडी, १९७८ मध्ये स्थापन झालेली, आज नागपूरच्या जंगलात बंदिस्त आहे. या गाडीने अनेक वर्षे शहरातील मुलांना आनंद दिला, परंतु आज तिची अवस्था चिंताजनक आहे.
नागपूरच्या प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात ५००१ दीपांच्या प्रकाशात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आकर्षक रांगोळ्या आणि ३० फुटांचा स्वस्तिक सजविला जाणार आहे.