शिव विहार कॉलनीत दिवाळी पहाट रंगली!

नागपूर : 

सोनेगाव येथील शिव विहार कॉलनीत  दिवाळी पहाट कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कॉलनीतील तसेच परिसरातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.कॉलनीत प्रथमच आयोजित या कार्यक्रमासाठी आकर्षक रंगमंच व सुंदर सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे सजावटीची जबाबदारी कॉलनीतील महिलांनी सांभाळली.

कार्यक्रमात स्वरमंजिरीच्या  क्षमा नायक व  निलांबरी पाचखेडे यांनी बहारदार निवेदन केले. तसेच त्यांनी सुमधुर गीतेही सादर केली. प्रशांत मुन्शी, अंजली विघ्ने, डॉ. कल्याणी कापसे, वैशाली व भूषण महाजन आणि मयुरेश गोखले यांनी विविध लोकप्रिय गीते सादर करून रसिकांची मने जिंकली.संगीत, उत्साह आणि दिवाळीच्या आनंदाने हा पहाट सोहळा संस्मरणीय ठरला.