नागपूर:
पार्थ टूर अँड ट्रॅव्हल, नागपूर यांच्या वतीने आयोजित चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज आणि काशी तीर्थयात्रेत ४० भाविकांनी सहभाग घेतला. ही यात्रा २२ तारखेला नागपूर येथून सुरू झाली आणि २८ तारखेला सुखरूप परतली.
यात्रेदरम्यान भाविकांनी अयोध्या, चित्रकूट, प्रयागराज येथील त्रिवेणी संगम आणि काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. उत्तम नियोजन आणि सहकार्यामुळे यात्रा आनंदात पार पडली. यात्रेचे नियोजन पार्थ टूर अँड ट्रॅव्हलचे संचालक आशिष भट्टलवार यांनी केले होते.सर्व भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. त्यांच्या अनुभवामुळे भविष्यातही अशा यात्रांचे आयोजन करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.



