नागपूर :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानेवाडा चौक येथील शिवसेना शाखेत भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख विक्रम राठोड यांच्या आयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी किशोर पराते, ज्येष्ठ शिवसैनिक राजेश कनोजिया, किशोर धोटे, सुखदेव ढोके, पुरुषोत्तम बन, शंकर थूल, शंकर बेलखोडे, मनोज चौधरी, विवेक भारती, श्रीकांत खंडारे, अमित निर्मळे, शुभम बालपांडे, पवन चावरे, राजेश रुईकर, अनिल बोरडे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थितांनी बाळासाहेबांच्या विचारांचे स्मरण करून सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनकार्यातून मिळत असल्याची भावना व्यक्त केली. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.



