नागपूर,
वैमानिक स्मित मच्छार यांनी दाखविलेल्या साहसाबद्दल त्यांना मानवंदना देण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी तरुण भारत, रामदासपेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त विंग कमांडर कॅप्टन राजीव भडंग उपस्थित होते. त्यांनी स्मित मच्छार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील प्रवाशांचे प्राण कशाप्रकारे वाचवले, याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे आयोजन राजु होले यांनी केले, तर महेशसोमलवार यांनी प्रास्ताविक केले. संदीप मानकर यांनी तुळशीचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. अशोकजी मुंदडा यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. रामदासपेठेतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता स्मित मच्छार यांना मानवंदना अर्पण करून आणि आभार प्रदर्शनाने झाली.



