नागपूर, 

यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (YCCE), नागपूरच्या ग्रंथालयातर्फे उन्नत भारत अभियानांतर्गत रायपूर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालयास १०० हून अधिक पुस्तके भेट देण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थी, युवक आणि नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, तसेच त्यांना विविध विषयांवरील ज्ञानसंपदा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.


YCCEचे प्राचार्य डॉ. उदय वाघे आणि अधिष्ठाता (नियोजन व विकास) डॉ. अरविंद भगत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रायपूरचे सरपंच उमेश आंबटकर, उपसरपंच चिराग शेटे, ग्रामसचिव शैलेंद्र टेंभुर्ने, सार्वजनिक वाचनालयाचे ईश्वर डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ व एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.ग्रंथालयाचे डॉ. राजेंद्र पहाडे, देवराव काळे आणि संजय जाधव यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला. पुस्तकांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना व नागरिकांना विविध विषयांचे साहित्य सहज उपलब्ध होऊन वाचन संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे ग्रामपंचायत वाचनालय पदाधिकाऱ्यांनी सांगितले.