रामटेक, 

 विदर्भ अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना, नागपूर यांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात रामटेक येथील ताई गोळवलकर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. युनिट प्रमुख पंकज बसाखेत्रे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय लाक्षणिक लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. राजेश गादेवार यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. सातव्या वेतन आयोगानुसार १०:२०:३० योजना लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा, जुनी पेन्शन योजना, रिक्त पदे भरणे, वेतनश्रेणीतील सुधारणा, विनाअनुदानित शाखेतील सेवा ग्राह्य धरणे तसेच सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करणे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.