नागपूर,

 न्यू नरसाळा रोडवरील प्रोसेस सभागृहासमोरील परिसरासह शहरातील अनेक मार्गांवर सलग व सुरक्षित फुटपाथचा अभाव असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. रस्त्यालगतच्या जागेचा विविध कारणांसाठी वापर होत असल्याने नागरिकांना रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.


सदर जागा फुटपाथ, रोड मार्जिन किंवा सार्वजनिक वापराची आहे का, तसेच तेथे असलेल्या हातगाड्या व स्टॉलला संबंधित विभागाची परवानगी आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मनपा प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व सलग फुटपाथ उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.