नागपूर,
मातृसेवा संघ समाजकार्य संस्था, बजाज नगर येथे संस्थापक प्राचार्य डॉ. सत्यबाला तायल यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त बालकांवरील लैंगिक हिंसाचार, बालसंरक्षण आणि न्यायप्रक्रिया या विषयावर ७ ऑक्टोबर रोजी परिसंवाद आयोजित करण्यात आला.
या परिसंवादात जिल्हा पॉक्सो सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयवंत यादव, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा छाया गुरव आणि बजाज नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी पॉक्सो कायद्याच्या तरतुदी, बालकांच्या संरक्षणातील विविध यंत्रणांची भूमिका आणि पीडित बालकांशी संवेदनशीलतेने वागण्याचे महत्त्व स्पष्ट केले.यावेळी बाललैंगिक अत्याचाराच्या विषयावर मूकनाट्य सादर करण्यात आले. रांगोळी प्रदर्शन, जनजागृती सेल्फी पॉईंट आणि बालसंरक्षण संकल्पस्वाक्षरी उपक्रमही राबविण्यात आले. प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती निसवाडे यांनी केले.



