नागपूर:
पायोनियर सोसायटी व अग्ने लेआऊट ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, खामला यांच्या वतीने आंतरभारती आश्रम, अत्रे लेआऊटजवळील बालमंदिर व पाळणाघरातील ११० बालकांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता आयोजित या उपक्रमात संस्थेचे संस्थापक डॉ. राजू मिश्रा उपस्थित होते. मित्र मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग फिस्के, प्रा. जयंत दलाल, उदय भोयर, अशोक दगडे, दिनकर सुपले, कृष्णराव भार्गव, अरुण मुद्देश्वर व ओंकार श्रीखंडे यांच्या हस्ते बालकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमासाठी संस्थेतील शिक्षिकांनी विशेष सहकार्य केले. दिवाळीचा आनंद वंचित बालकांपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. दिवाळीच्या फराळात विविध पदार्थांचा समावेश होता, ज्यामुळे बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.



