नागपूर, 

 भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा इंडियन फ्रेण्डस इन बेलेव्ह्यु या समुहातर्फे  झाला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता  युसुफभाई कपाडिया ह्यांच्या हस्ते भारतीय ध्वज 'तिरंगा' फडकवण्यात आली.

या कार्यक्रमाला जवळपास ६५ लोकांची उपस्थिती होती, ज्यात २७ महिला, २५ पुरुष आणि लहान बालकांसह उपस्थित होते. उपस्थित लोकांनी राष्ट्रगीत 'जण गण मन' आणि राष्ट्र गान 'वंदे मातरम' गायल्यानंतर देश भक्तीपर गाणे व भाषण सादर करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभात ध्वज फडकवण्याची प्रक्रिया भारतीय ध्वज संहितेनुसार पार पडली. या विशेष दिवशी स्वातंत्र्याचे एंशी व्या वर्षात पदार्पण संबंधी देशभक्तीपर भाषण देण्यात आले.