नागपूर: 

३१ ऑक्टोबर रोजी, ज्येष्ठ नागरिक मंडळ, पायोनियर व अग्ने-लेआउट, खामला यांच्या वतीने बुटीबोरी येथील 'साथ फाउंडेशन' संचालित 'पुनर्जन्म' वृद्धाश्रमाला भेट देण्यात आली. या उपक्रमात सुमारे ८० आजी-आजोबांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष श्री. भार्गव यांच्या हस्ते ₹२०,००० ची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम डॉ. राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात ३५ ज्येष्ठ नागरिक कुटुंबीयांसह उपस्थित होते.

श्री. व सौ. प्रयाग डोंगरे यांच्या सेवाभावी कार्याचे सर्वांनी कौतुक केले. उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शेवटी, डोंगरे दाम्पत्याने सर्वांचा स्नेहपूर्वक पाहुणचार केला. हा उपक्रम माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा असल्याने आनंदात संपन्न झाला.