नागपूर:
अंध विद्यालयात शंकरनगर येथील मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली. या भेटीत दोन्ही विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे प्रार्थना सादर केली. मूकबधिर विद्यार्थ्यांचे हातवारे आणि अंध विद्यार्थ्यांचे शब्द यांच्यातील संवाद शिक्षकांनी साधून दिला.
शिक्षकांनी दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये सेतू बनत संवादाची सुंदर वाट खुली केली. या अनोख्या भेटीतून संवादासाठी शब्दांपेक्षा एकमेकांना समजून घेण्याची भावना महत्त्वाची असते, हा संदेश मिळाला. या प्रसंगाने हेलन केलर यांच्या प्रेरणादायी जीवनाची आठवण करून दिली. शारीरिक मर्यादा संवादाच्या आड येऊ शकत नाहीत, हे या भेटीतून अधोरेखित झाले.



