नागपूर: 

ग्रामायण प्रतिष्ठान आणि सर गंगाधरराव चिटणवीस मेमोरियल मेडिकल रिसर्च ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अभ्युदय सेवा प्रदर्शनात' गोरेपेठ येथील महिला कला निकेतन संस्थेने सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध सामाजिक क्षेत्रात निस्पृहपणे कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे (NGO) स्टॉल्स आहेत.

महिला कला निकेतनच्या स्टॉलवर संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात येत असून, नागरिकांना सहकार्य व दान करण्याची संधीही उपलब्ध आहे. पितृपंधरवड्याच्या निमित्ताने पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता आणि दान या भावनेतून नागरिकांनी या सेवाप्रदर्शनाला भेट देऊन सामाजिक कार्याला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सेवाप्रदर्शनाची माहिती

सेवाप्रदर्शनाचे आयोजन २ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची वेळ दुपारी ३ ते रात्री ९ आहे. स्थानिक नागरिकांसाठी हे प्रदर्शन चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित केले आहे.