नागपूर: महिला कला निकेतन आणि अमृत पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अंकुर दीपावली बाजाराला’ नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिला उद्योजिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे होता.
नागपूर: महिला कला निकेतन, गोरेपेठ येथे तीन दिवसीय शारदा उत्सव विविध सांस्कृतिक व कलात्मक उपक्रमांनी संपन्न झाला. यामध्ये ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांविषयी जनजागृती करणारा देखावा सादर करण्यात आला.
नागपूर: अंकुर प्री-स्कूलमध्ये दसरा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. विविध कथा आणि उपक्रमांच्या माध्यमातून सत्याचा विजय, धैर्य आणि शौर्य यांचे महत्त्व मुलांना समजावून सांगण्यात आले.
नागपूर: ग्रामायण प्रतिष्ठान आणि सर गंगाधरराव चिटणवीस मेमोरियल मेडिकल रिसर्च ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अभ्युदय सेवा प्रदर्शनात' महिला कला निकेतनने सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या प्रदर्शनात नागरिकांना संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती मिळणार असून, सहकार्य व दान करण्याची संधीही…