नागपूर : 

गोपाल नगर परिसरातील रस्त्यावर अनेक महिन्यांपासून पडलेला खड्डा अद्यापही न बुजवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. स्थानिक नगरसेवकांच्या नियमित वर्दळीच्या मार्गावरच हा खड्डा असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक व दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका वाढला असून, तातडीने डांबर टाकून खड्डा बुजवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कोट्यवधींचे रस्ते प्रकल्प हाती घेतले जात असताना किरकोळ दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. तसेच खड्ड्यांच्या तक्रारींसाठी प्रभावी यंत्रणा उभारून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.