नागपूर, 

श्रीरामचंद्रांच्या जीवनातील आदर्श मूल्ये अंगीकारून त्यातून प्रेरणा घेत राष्ट्राला अधिक शक्तिशाली बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक प्रा. रविंद्र भुसारी यांनी केले.


श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला महाल येथील डॉ. हेडगेवार निवासस्थानी आयोजित विशेष कार्यक्रमात गीतकार अमोल तपासे लिखित ‘वंदनीय प्रभू श्रीराम’ या भक्तिगीताचे लोकार्पण प्रा. भुसारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.‘वंदनीय प्रभू श्रीराम’ हे केवळ भक्तिगीत नसून श्रीरामांच्या आदर्शातून देशहिताची प्रेरणा देणारे माध्यम आहे. या गीतातून प्रभू श्रीरामांचे विचार घराघरांत पोहोचतील, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिणमूर्ती नगर संघचालक दिनेश वंडलकर होते. गीताला सारंग माळीचकर यांनी संगीत दिले.