नागपूर: 

श्री सर्वेश्वर संकटमोचन हनुमान सेवा समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे काकड आरती व त्रिपुरी पौर्णिमाचा कार्यक्रम श्री सर्वेश्वर संकटमोचन हनुमान मंदिर, इंद्र नगर, न्यू नरसाळा रोड येथे संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमात महाप्रसादाने समापन दि. २७/११/२०२६ ला झाला.

या कार्यक्रमाची स्थापना २५ वर्षांपूर्वी श्री टेकसिंग निकम काकांनी केली होती, आणि त्यांची परंपरा आजही यशस्वीपणे चालू आहे. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग होता. महिला कार्यकर्ता  लता बुरडकर, तिनखेडे  यांच्या मार्गदर्शनाखाली  निलेश वर्मा,  रवि हिरसकर, संदिप पोरटकर आणि विशाल मुरकुटे यांसारख्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने काम केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपराश्री सर्वेश्वर संकटमोचन हनुमान मंदिरात मागील ३० वर्षांपासून श्री गणेश उत्सव, हनुमान जन्मोत्सव, नवदुर्गा घटस्थापना व इतर सांस्कृतिक कार्यक्रम हर्ष व उत्साहाच्या वातावरणात आयोजित केले जातात. यंदाच्या त्रिपुरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले,