नागपूर : 

नरेंद्र नगर येथील पी.एम.जी. वसाहतीतील सिद्धिविनायक श्री गणेश मंदिरात तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील ३०० हून अधिक बालगोपालांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत आकर्षक सजविलेले लाकडी बैल, सामाजिक संदेश व घोषवाक्यांसह मिरवणूक काढली.

बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्कृष्ट बैल सजावट, आकर्षक वेशभूषा तसेच सामाजिक प्रबोधनात्मक संदेश व घोषवाक्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये २५ गुणवंत बालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सहभागी अन्य बालकांनाही विविध बक्षिसे देण्यात आली. महिला, पालक, आजी-आजोबा, नागरिक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी उपस्थित राहून बालकांचा उत्साह वाढविला.