राजाबाक्षा मैदानावर विराट हिंदू संमेलन संपन्न
नागपूर : राजाबाक्षा मैदानावर सकल हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
विजय कैचे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंचपरिवर्तन, सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य या विषयांवर सखोल चर्चा झाली.
संमेलनात समाजातील एकता दृढ करण्यावर भर देण्यात आला. तसेच संघकार्य वृद्धीसाठी विविध ठोस निर्णय घेण्यात आले. सामाजिक कार्यात सहभाग वाढविणे, पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम राबविणे आणि नागरी कर्तव्यांविषयी जनजागृती करणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
या संमेलनामुळे हिंदू समाजात एकजुटीचा संदेश देण्यात आला असून कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.



