बंजारा एकता संकल्प यात्रेचे नागपूर नगरीत भव्य स्वागत

नागपूर,

सेवागड कर्नाटक येथून निघालेल्या बंजारा एकता संकल्प यात्रेचे नागपूर येथे आगमन झाले.  संविधान चौक, नागपूर येथे या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आत्मराम चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी कारभारी एड. बद्रीप्रसाद चव्हाण, युवा नेते प्रा. प्रविणभाऊ पवार,  दुलसिंगजी राठोड, पिरूसिंग राठोड यांसारख्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वप्रथम संविधान उद्देशिकेला पुष्प अर्पण करण्यात आले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

यात्रेच्या स्वागतासाठी श्री संत श्री महाराज धर्माधिकारी, सेवागड संस्थान कर्नाटक, तसेच संस्थापक बंजारा एकता संकल्प यात्रा, संत श्री सेवालाल महाराज कर्नाटक, प्रविण राठोड दिल्ली, सरदार पंचप्यारेजी, सदाशिव चव्हाण, विलास रामावत, कांतीलाल नायक, बाळासाहेब राठोड राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना, बच्चनसिंग बंजारा UP, विजय पालत्या, आणि संतोष राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद यांसारख्या मान्यवरांचा समावेश होता.

कार्यक्रमात पिरूसिंग राठोड, डॉ. अरविंद पवार यांनी मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमसिंग पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डी. बी. चव्हाण यांनी केले. या कार्यकमाला शेकडो बंजारा बांधव उपस्थित होते.

यात्रेचा उद्देश आणि महत्त्व

बंजारा समाज हा भारतातील अनेक राज्यांमध्ये वास्तव्य करणारा एक महत्त्वाचा समाज आहे. त्यांच्या आराध्य दैवतांचा समावेश संत सेवालाल महाराज आणि जगदंबा माता यामध्ये होतो. बंजारा समाजाच्या विविध राज्यांतील प्रवर्गानुसार, शैक्षणिक, सामाजिक व शासकीय योजनांमध्ये असमानता निर्माण होते. त्यामुळे 'वन नेशन – वन कॅटेगरी' या तत्त्वानुसार समान प्रवर्ग निश्चित करण्याची मागणी अनेक सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

स्वागत समारंभातील विशेष कार्यक्रम

स्वागत समारंभात माता जगदंबा देवी वसंत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. बंजारा नृत्य आणि बंजारा गीत यांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात वृक्ष संवर्धन आणि गोरक्षणाची महत्त्वाची माहिती देण्यात आली.