कामठीत हिंदू धर्म जनजागृती उत्सवाचे आयोजन

कामठी, 

२६ ऑक्टोबर : कामठी येथील शिक्षक सहकारी शाळेच्या प्रांगणात हिंदू धर्म जनजागृती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवात योग, नियुद्ध आणि लाठी-काठीची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. तसेच वैयक्तिक गीत आणि सुभाषितांचा कार्यक्रम होणार आहे. हिंदू धर्माची मूल्ये व संस्कृती यांविषयी जनजागृती करणे आणि समाजात एकात्मतेची भावना वाढविणे हा उत्सवाचा उद्देश आहे.