श्री जैन सेवा मंडळाचे विद्यमाने भाव तीर्थ यात्रेचे आयोजन
नागपूर,
श्री जैन सेवा मंडळाने जैन भाव तीर्थ यात्रेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या यात्रेत 200 पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी झाले. हे आयोजन महावीर जन्म कल्याण महोत्सव 2026 च्या निमित्ताने करण्यात आले होते, ज्यामध्ये मंडळाने आठवडाभर विविध कार्यक्रमांची योजना केली आहे.ही यात्रा श्री कुंदकुंद स्वाध्याय जैन महावीर मंदिर, नेहरू पुतळा येथून सुरू झाली. यामध्ये इतवारीतील परवार मंदिर, ओसवाल पंचायती मंदिर, सैतवाळ जैन मंदिर आणि सेणगन जैन मंदिर, दिगंबर जैन मोठे मंदिर, श्री जैन श्र्वेतांबर मुर्ती पूजक तपगच्छ संघ, इतवारीतील इतर जैन मंदिरांचा यात समावेश होता. या सर्व ठिकाणी जाऊन जैन धर्माच्या महत्त्वाच्या स्थळांचे दर्शन घेण्यात आले.महावीर जन्म कल्याण निमित्याने इतवारीतील विविध मंदिरांचे दर्शन करणे म्हणजे एक प्रकारचे यात्रेचे स्वरूप निर्माण करणे हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या माध्यमातून जैन धर्माच्या अनुयायांना एकत्र येण्याची संधी मिळणे आणि त्यांचा धार्मिक अनुभव अधिक समृद्ध होईल.
या यात्रेचे संघपती रमाकांत सिंगतकर होते. यात्रेला हिरवी झेंडी नरेश जैन यांनी दिली. जैन सेवा मंडळाचे महामंत्री डॉ दीपक शेंडेकर, माजी अध्यक्ष दिलीप गांधी शरद मचाले, डॉ सुरेश जैन डॉ संतोष मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यात्रेची सुरुवात नेहरू पूतळा येथून सुरू झाली यात्रेत पूलक जन चेतना मंच महाल शाखा महावीर वार्ड शाखा यांचे विशेष सहकार्य लाभले यात्रेत महावीर विद्यानिकेतन चे विद्यार्थी व नेहरू पूतळा महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी मनोज मांडवगडे नरेश मचाले जितेंद्र गडेकर राजेंद्र सोनटक्के किशोर कहाते, डॉ चंद्रनाथ भागवतकर प्रशांत कहाते रमेश उदेपूरकर आदी सहभागी झाले होते



