नागपूर : 

स्व. कमलाताई होस्पेट यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतिशिखा कमळाई’ हे महानाट्य नोव्हेंबरमध्ये रंगमंचावर येणार आहे. यानिमित्त २ ऑक्टोबर रोजी राजेंद्र हायस्कूल येथे नाट्यवाचन झाले.

प्रा. डॉ. दमयंती पांढरीपांडे लिखित व प्रभाकर ठेंगडी दिग्दर्शित या महानाट्याची प्रस्तुती स्वरमंथन, नागपूरची आहे. मुकुंद वसुले, शोभना मोहरील, विनोद तुंबडे, मनीष मोहरील, रोहिणी मोहरील, ऐश्वर्या शिंदे, आदिती शिंदे, स्नेहल तांबेकर व प्रभाकर ठेंगडी यांनी साभिनय नाट्यवाचन केले. प्रारंभी दीपप्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले. यावेळी लेखक पराग घोंगे यांच्यासह कलावंत व कमलाताईंच्या कार्याशी जोडलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.