निर्मल विश्व स्वर साधना संगीत वर्गाचा तृतीय वर्धापन दिन 3 ऑक्टोबर रोजी डिडोळकर भवनात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विविध गायक कलाकारांनी शास्त्रोक्त रागांवर आधारित गाणी सादर केली.
निर्मल विश्व स्वर साधना संगीत वर्गाचा तृतीय वर्धापन डिडोळकर भवनातील संस्कार भारती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजसेविका व तेजस्विनी मंचच्या संस्थापिका किरणताई मुंधडा आणि परांजपे शाळेच्या संचालिका भावनाताई खरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.गेल्या २२ वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सीमाताई दामले यांनी प्रास्ताविकातून संगीत वर्गाची संकल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी नोटेशनच्या आधारे सुगम संगीत सादर करावे आणि त्यातून स्वरज्ञान विकसित व्हावे, हा उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात शास्त्रीय रागांवर आधारित लोकप्रिय गीतांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची तयारी आणि सादरीकरणातील सुरेलता विशेष लक्षवेधी ठरली. वेद ढोक यांनी तबल्यावर, अथर्व टेकाडे यांनी साइड रिदमवर, सोहम रानडे यांनी तालवाद्यावर, तर श्यामजी ओझा आणि श्रावणी भोयर यांनी संवादिनीवर साथसंगत केली. संगीताच्या सुरेल वातावरणात वर्धापन दिनाचा कार्यक्रम रंगला.
नागपूर - संत श्री ज्ञानेश्वर मंदिरात 'संजीवन समाधी सोहळा २०२६' चा आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर: श्री सर्वेश्वर संकटमोचन हनुमान सेवा समितीच्या वतीने इंद्र नगर येथे काकड आरती व त्रिपुरी पौर्णिमाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महाप्रसादाने समापन झाला.
नागपूरच्या प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात ५००१ दीपांच्या प्रकाशात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आकर्षक रांगोळ्या आणि ३० फुटांचा स्वस्तिक सजविला जाणार आहे.