नागपूर,

पितृपंधरवड्यानिमित्त धर्म जागरण संस्थेतर्फे ४ ऑक्टोबर रोजी नेताजी मार्केट, सीताबर्डी येथील राधाकृष्ण मंदिरात कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता श्री दिगंबर कामत यांचे कीर्तन होणार आहे. धर्मजागृतीच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.