नाट्यलेखक,दिग्दर्शक व ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकरराव ठेंगडी यांना साहित्य साधक पुरस्कार

स्व.वामनराव जोशी जन्मशताब्दी उत्साहात साजरी

 स्व. वामनराव जोशी जन्मशताब्दी सोहळा व     *साहित्य साधक पुरस्कार प्रदान सोहळा संत  पाचलेगावकर मुक्तेश्वर  आश्रम सोमलवाडा येथे संपन्न झाला यावेळी सुप्रसिद्ध नाट्यलेखक, दिग्दर्शक व ज्येष्ठ रंगकर्मी  श्री. प्रभाकर ठेंगडी यांना साहित्य साधक पुरस्कार प्रदान करण्यात आला*.  शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हे या पुरस्काराचे दुसरे वर्ष असून  स्वर्गीय वामनराव जोशी जन्मशताब्दीचे 21 वे वर्ष आहे.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभाकरराव जोशी यांच्या बासरी वादनाने झाली. त्यानंतर साहित्य साधक पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला .माजी साहित्य साधक अनिल शेंडे यांच्या उपस्थितीत यावर्षीचे साहित्य साधक माननीय प्रभाकर ठेंगडी यांचा सत्कार जोशी कुटुंबीयांनी केला. 

साहित्य साधक पुरस्कार 

कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात ह भ प राहुल गणोरकर यांचे अत्यंत सुंदर व प्रबोधनात्मक किर्तन झाले. कार्यक्रमाचे संचालन नारायण जोशी यांनी केले.कार्यक्रमाला जोशी परिवार, आप्तस्वकीय व इष्टमित्र यांची भरगच्च उपस्थिती होती. मातृ पितृ स्मृती कार्यक्रमाच्या निमित्ताने जोशी परिवाराने मातापित्यांचे उतराई होण्याचा एक उत्तम आदर्श समाजापुढे ठेवला आहे. कार्यक्रमाला उज्वलाताई अंधारे, रेखा शुक्ला ,राहुल व मोना ठेंगडी, प्रियंका गणोरकर,राजलक्ष्मी, अंजली आणि प्रीती जोशी, सुनंदा साल्पेकर, शोभना ताई मोहरील ,रोहिणी मोहरील प्रामुख्याने उपस्थित होते .प्रशांत जोशी यांनी आभार मानले आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.