नागपूर

दिवंगत वसंतराव (बापूसाहेब) साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्य, विचार, मूल्ये आणि सामाजिक योगदानाचे स्मरण करून देणाऱ्या वसंत स्मृती’ स्मृतिग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आले.या वेळी गडकरी यांनी वसंतराव साठे यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे व कार्याचे दस्तऐवजीकरण भावी पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे नमूद केले. डॉ. उदय बोधनकर यांनी गडकरी यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमात वसंतराव साठे यांच्यासोबतचा सहवास आणि आठवणी विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या. ‘वसंत स्मृती’च्या निर्मितीत योगदान देणाऱ्या मोनाल मालजी, मकरंद कुलकर्णी, डॉ. सुधीर मंगरुळकर, नरेंद्र गजभिये आणि प्रियांका बोधनकर यांचा सत्कार करण्यात आला.प्रभाकर दुपारे यांच्या मुख्य संपादनाखाली, डॉ. उदय बोधनकर यांच्या संपादनात आणि सुनीती बोधनकर यांच्या सहसंपादनातून हा ग्रंथ साकारला आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्र, सहकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.