नागपूर ,
रामनवरात्रीच्या पवित्र दिवशी, घरात १ ३ वेळा रामरक्षा म्हणण्याचा संकल्प करण्यात आला. या विशेष प्रसंगी, काही मित्रमंडळी आणि नातेवाईक असे २ ० जण एकत्र जमले आणि रामरक्षेचे पठण केले. घरात रामरक्षेचे सूर दुमदुमले आणि चौफेर प्रसन्नता दाटली.
या कार्यक्रमात सर्व सहभागी मंडळी मंगलवेषात आले होते. प्रत्येक आवर्तनानंतर रामनामाचा गजर करण्यात आला, ज्यामुळे भक्तिमय वातावरण आणखी गहिरे झाले . आरती आणि प्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
या विशेष प्रसंगी श्री व सौ गोरंटीवार, देशपांडे, अग्निहोत्री, नक्कनवार, महाजन, संध्या, सुषमा, ज्योती, अनघा आणि शुभदा यांसारख्या अनेक मित्रांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यातून रामरक्षेचे पठण यशस्वीपणे संपन्न झाले.



