वृत्तबद्ध कवितांच्या अंताक्षरीत वामनपंडित चमू विजेता
नागपूर,
चिटणवीस सेंटरच्या टॅमेरींड सभागृहात किरण संगवई यांच्या आयोजनातून वृत्तबद्ध कवितांची अंताक्षरी स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत वामनपंडित, मोरोपंत आणि केशवसूत असे तीन चमू सहभागी झाले होते.
वामनपंडित चमूमध्ये वर्षा देशपांडे, सुजाता संगीतराव व किरीट देशपांडे, मोरोपंत चमूमध्ये अजय निल्दावार, वैजयंती सराफ व किरण संगवई, तर केशवसूत चमूमध्ये अंजली पारनंदीवार, प्रगती भुजाडे व प्रतिमा सहस्रबुद्धे यांनी सहभाग घेतला. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या स्पर्धेत वामनपंडित चमू विजयी ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री अंबासकर यांनी केले. उपस्थित रसिकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त दाद दिली.



