भाषेच्या गोडीतून साहित्य फुलताना महिलांना मानाचे स्थान देत सर्जनशील शब्दवेलने साहित्याच्या व्यासपीठावर नारीशक्ती सन्मान केला. हा कार्यक्रम ५ एप्रिल २०२६ रोजी,सिंहगड पुणे येथे संपन्न झाला. ज्या महिला नोकरी व घर सांभाळून इतर क्षेत्रातही त्यांचे बहुमुल्य योगदान देतात त्यांना नारीशक्ती सन्मान हा न्याय देणारा व प्रेरक ठरला. या कार्यक्रमात बालाजी सरोज भाव काव्य साहित्य प्रतिष्ठान, नागपुरच्या अध्यक्ष सरोज अंदनकर यांना *सर्जनशील शब्दवेल नारीशक्ती सन्मानाने* गौरविण्यात आले. यावेळी प्रवीण बोपुलकर, अश्विनी अतकरे , देवेंद्र इंगळकर, अमोल चरडे आदि. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भव्य सन्मान पत्र, सन्मान चिन्ह,शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.यावेळी शीतल राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनही घेण्यात आले.
५ एप्रिललाच सरोज अंदनकर यांना पुण्यातच वानवडी येथे महात्मा फुले सांस्कृतिक भवनात *युवा संकल्प महाराष्ट्र भूषण* पुरस्काराने , *आदर्श साहित्य रत्न पुरस्काराने , वसुधा फौंडेशनतर्फे 'कर्तृत्ववान नारीशक्ती पुरस्काराने आणि रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड तर्फे *समाजरत्न* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पाच पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रात अंदनकर यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



