नागपूर: '
आत्मीय सत्संग मंडळ, नागपूर' तर्फे गुरुहरी हरिप्रसाद स्वामीजी महाराज यांच्या प्राकट्य दिनानिमित्त सीताबर्डी येथील कुंभार टोळी येथे एका भव्य नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र प्रमुख (मुंबई व गोवा धर्म प्रसार आयाम) श्री. अजय निलदावार यांनी उपस्थितांना संबोधित केले. निलदावार यांच्या ओजस्वी भाषणात त्यांनी वर्तमान काळातील देशविरोधी शक्तींकडून उभ्या राहिलेल्या गंभीर आव्हानांची चर्चा केली. 'लव्ह जिहाद', 'धर्मांतरण' आणि 'आतंकवाद' यांसारख्या समस्यांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, 'या संकटांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आणि हिंदू समाज संघटित करण्यासाठी 'आत्मीय सत्संगा'ची नितांत आवश्यकता आहे. सनातन हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे आद्यकर्तव्य आहे.'
या गरिमामयी कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून यशवंत खरे आणि आत्मीय सत्संग मंडळाचे प्रमुख . संजय श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या औचित्य साधून परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
या नामसंकीर्तन सोहळ्याला कुंभार टोळी परिसरातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाने उपस्थितांना एकत्रित करून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एकजुटीच्या संदेशाचा प्रसार केला.कार्यक्रमाची यशस्विता आणि उपस्थितांची उत्सुकता यामुळे या प्रकारच्या कार्यक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे. हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी 'आत्मीय सत्संग' ही एक आवश्यक पायरी ठरली आहे.



