केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘जागर शारदेचा, उत्सव मेहंदीचा’ या विशेष मेहंदी रेखाटन कार्यक्रमाचे आयोजन दुर्गा देवी मंदिर, सोनेगाव येथे नुकतेच करण्यात आले. या उपक्रमाला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल २०४ भगिनींच्या हातांवर आकर्षक मेहंदी रेखाटण्यात आली.

महिलांच्या कलागुणांना वाव देणारा आणि उत्साह, आनंद व सांस्कृतिक परंपरेचा संगम घडवणारा हा उपक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या संयोजिका नगरसेविका माया हाडे, महामंत्री, महाराष्ट्र प्रदेश प्रगती पाटील, महामंत्री, नागपूर, वंदना शर्मा माजी नगरसेविका स्नेहल गोतमारे, माजी नगरसेविका मीना तेलगोटे, मंडळ अध्यक्ष अश्विनी सावदेकर, त्रिमूर्तीनगर मंडळ महामंत्री वर्षा गोडबोले, संपर्कमंत्री रेणू गेडाम, वॉर्ड अध्यक्ष संगीता कावरे, वॉर्ड महामंत्री कविता सोलमकर, ओबीसी महामंत्री अनिता तिरपुडे, वॉर्ड अध्यक्ष साधना दाते, रीता नेवरे तसेच इतर मान्यवर व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या नंदा लिडबे, श्वेता खोडे, हेमा शेंडे, वंदना मोहिले, स्वाती झोटिंग, करुणा करंजकर, शुभांगी अंधारे आणि मनीषा दुबे यांनी मेहनत घेतली.