नागपूर:

स्थानिक सूर मिलन ग्रुपने २५ ऑक्टोबर रोजी कार्तिक हॉलमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘आओ चाँद पर गाएँ’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात चंद्रावर आधारित हिंदी व मराठी गीतांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाची सुरुवात ‘चांदण चांदण झाली रात’ या देवी भक्तिगीताने झाली. यानंतर अनेक कलाकारांनी एकल आणि युगल गीते सादर केली. कार्यक्रमाची सांगता ‘आओ तुम्हें चाँद पे ले जाएँ’ या गाण्याने झाली. 

या कार्यक्रमात कमलेश टहिल्यानी, मकरंद बक्षी, सुहास कुलकर्णी, विनोद आठवले, धनंजय रुईकर, चंद्रहास बल्लाळ, अतुल गाडगीळ, विजय डोळके, डॉ. अरविंद काळे, मिलिंद देशमुख, डॉ. अश्लेष मुरकुटे, डॉ. मानसी कान्हे, नीलिमा कदम, रजनी देशमुख, वर्षा देशमुख, डॉ. तृप्ती गावंडे, संगीता बक्षी आणि पल्लवी दाऊतखानी यांचा समावेश होता.या कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे आयोजन मकरंद बक्षी यांनी केले, तर व्हिडिओ व ध्वनिव्यवस्था प्रवीण मुदलियार यांनी सांभाळली.