प्रति,

मा. संपादक महोदय,

स्वरसाधना तर्फ

*स्वरसाधना आयोजित 'बिंब प्रतिबिंब' कार्यक्रम मंगळवार ३ नोहेंबरला* 

स्वरगंधर्व स्व. सुधीर फडके व श्रीधर फडके या पितापुत्रांनी संगीतबद्ध केलेल्या व गायलेल्या गीतांचा *बिंब प्रतिबिंब* हा कार्यक्रम स्वरसाधना तर्फे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मातृसेवा संघ वरोऱ्याच्या माजी अध्यक्ष स्व. उषाताई नारायणराव देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ  सादर करण्यात येणार आहे. 

बिंब प्रतिबिंब हा कार्यक्रम मंगळवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात संध्याकाळी ६.३० वाजता संपन्न होईल.

कार्यक्रमाला बिंदुमाधव देव (अध्यक्ष , लोकतंत्र सेनानी संघ, नागपूर)  सुवर्णरेखा पाटील (अध्यक्ष,मातृसेवा संघ, वरोरा) यांची प्रमुख उपस्थिती  अनुपमा आनंद टेंभुर्णीकर ( मुख्य प्रबंधक,WCL ) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. 

श्याम देशपांडे, सुचित्रा कातरकर, सुवर्णरेखा पाटील , रसिका करमाळेकर , आशिष घाटे,विजय देशपांडे, छाया वानखेडे,  प्रा पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले हे गायक गीते सादर करतील. त्यांना  गोविंद गडीकर ( सिंथेसायझर) मोरेश्वर दशसहस्त्र,रवी सातफळे (तबला) विक्रम जोशी (तालवाद्य) हे वादक कलावंत साथसंगत करतील.  निवेदन विवेक अलोणी यांचे तर सूत्रसंचालन प्रा. उज्ज्वला अंधारे यांचे आहे.  सुमधुर गीतांच्या या कार्यक्रमाला रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा कलेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.