नागपूर,

 २४ ऑक्टोबर २०२६ - दिव्हाइन व्हिजन फिल्म प्रॉडक्शनच्या आगामी मराठी चित्रपट ‘आशांतर’मधील आयटम साँगचे रेकॉर्डिंग मुंबईतील लता मंगेशकर स्टुडिओमध्ये पार पडले. या गाण्याला सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी आवाज दिला आहे.

चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक जय लाहोरी असून, राकेश पटेल सहनिर्माते आहेत. गाण्याचे संगीत संयोजन अजिंक्य सोंटक्के आणि बाबा किशोर यांनी केले आहे, तर गीतलेखन पद्माकर मलकापुरे यांचे आहे.या रेकॉर्डिंग प्रसंगी अभिनेते शाम थोम्बरे, लाइन प्रोड्युसर मीनल देसाई, डीओपी साहिल सातदेवे, प्रॉडक्शन हेड शशांक नहार यांच्यासह शशांक राऊत, प्रशांत चव्हाण आणि रवींद्र वीरकर उपस्थित होते.‘आशांतर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच नागपुरात सुरुवात होणार आहे. चित्रपटाच्या तयारीला वेग आला असून, निर्माते-दिग्दर्शक जय लाहोरी आणि सहनिर्माते राकेश पटेल यांनी गायिका, संगीतकार, गीतकार व तांत्रिक टीमचे अभिनंदन केले आहे.