क्लाउड नाइन' या संस्थेने बॉलिवूड मेलेडिज' हा कार्यक्रम आयोजित केला होता .संध्याकाळी ५.३० वाजता सायंटिफिक सभागृहात संपन्न झाला. 'यांद किया दिलने कहॉ हो तुम' या गीताने कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली. आपके हंसी रुखपे आज, परदेंमे रहने दो, पिया तोंसे नयना लागे रे ,निगाहें मिलाने को जी चाहता है, पियाँ बाबरी, होंठोंमे ऐसी बात दबाती, हमसफर मेरे हमसफर, मेरे जीवनसाथी प्यार किये जा, मेरे ख्वाबोंमें जो आये . अशा एका पेक्षा एक सुरेल सुमधुर ३२ गीतांनी मैफिलीत रंग भरत पकड घेतली . जवाने जाने मन हसीन दिलरुबा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. रसिकांनी गीतांचा मनमुराद आनंद लुटला. बऱ्याच गीतांना रसिकांनी उत्तम दाद देत वन्समोअरची मागणी केली.
मुकुल पांडे, पद्मजा सिन्हा, दीपाली पनके, मेधा हरिदास , मृदुल पुरोहित, शशिकांत वाघमारे , श्याम बापटे, हेमंत राऊत, दीपक दुधमोगरे,संजय वाघमारे, वैभव पुसदकर, मुकुल नांदे , प्रकाश देशपांडे, प्राजक्ता, रजनी ठाकरे, मानसी बढे, वंदना कडू, प्रीती कुळकर्णी, गौरी बावडेकर, रश्मी रैतेर या गायक कलाकारांनी हिंदी चित्रपट गीते सादर करत रसिकांना निखळ स्वरानंद दिला. त्यांना सचिन ढोमणे, नचिकेत देव , पंकज यादव, अक्षय हरले , मनोज विश्वकर्मा या वादक कलाकारांनी सुयोग्य साथसंगत केली. प्रा . उज्ज्वला अंधारे यांनी माहितीपूर्ण व नेटके सूत्रसंचालन केले.
रसिक श्रोत्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.



