• स्वरसाधना, लोकतंत्र सेनानी संघ, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ, नागपूर आयोजित  'मंगेशकरांची गाणी' 'दिनानाथ ते हृदयनाथ' या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक  १० जुलै २०२६ ला सायंकाळी  ६.३० वाजता लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात केले आहे.यात दीनानाथ मंगेशकर ते हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेल्या सुमधुर गीतांचा समावेश आहे.तसेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री सुचित्रा कातरकर यांनी लता दीदींवर रचलेल्या निवडक गीतांचाही समावेश यात आहे.

कार्यक्रमाला माजी आमदार मा आमदार अनिल सोले, सामाजिक कार्यकर्ती सुवर्णरेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्याम देशपांडे,रसिका करमाळेकर , सुचित्रा कातरकर, आशिष घाटे, विजय देशपांडे,छाया वानखेडे, प्रा.पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, आकांक्षा चारभाई, आर्या देशपांडे ही गायक मंडळी दीनानाथ मंगेशकर, लतादीदी, आशा भोसले, मीना खडीकर,उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांची गीते सादर करतील.त्यांना सिंथेसायझरवर आनंद मास्टे,तबल्यावर मोरेश्वर दशसहस्त्र, आशिष घाटे,व तालवाद्यावर विक्रम जोशी साथसंगत करणार आहेत. प्रा.उज्ज्वला अंधारे यांचे निवेदन आहे. कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून स्वरानंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.