*संगीत एकच प्याला* *या अजरामर शोकांतिकेचा मंगळवार 11 ऑगस्टला प्रयोग*

भाषाप्रभू कै. राम गणेश गडकरी यांची अजरामर साहित्यकृती *संगीत एकच प्याला* या शोकांतिकेचा मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट सायं 6:30 कविवर्य सुरेश भट सभागृहात नाट्यप्रयोग होत आहे.

कै. बाबासाहेब   नाहातकर जन्मशताब्दी निमित्ताने होत असलेल्या प्रयोगाची निर्मिती मध्य प्रदेश एज्युकेशन सोसायटीची असून निर्माते मोहन नाहातकर आहेत. 

या नाटकाचे दिग्दर्शन नागपुरातील ज्येष्ठ दिग्दर्शक प्रभाकर ठेंगडी यांनी केले असून सुधाकर - मनीष मोहरील, सिंधू- यामिनी पायघन, रामलाल - गुणवंत घटवाई, तळीराम - मुकुंद वसूले, गीता- रोहिणी मोहरील, पद्माकर- विनोद तुंबडे, भगीरथ- यशवंत चोपडे हे कलावंत प्रमुख भूमिकेत असून, विनोद काळे, अशोक गवळी, शेखर मंगळमूर्ती, नारायण जोशी ,सचिन कानडे, राजेश चवडे व शार्दुल मोहरील हे सहयोगी भूमिकेत आहेत.

संगीताची साथ संगत ऑर्गन- भास्कर पिंपळे, व्हायोलिन- अजय वेखंडे ,तबला- मोरेश्वर दहासहस्त्र करीत आहेत.

तसेच तंत्रज्ञ नेपथ्य- सतीश काळबांडे,

नेपथ्य सहाय्य - देवेंद्र निखारे ,

प्रकाश योजना- किशोर बत्तासे,

रंगभूषा - लालजी श्रीवास,

ध्वनी संयोजन - बंडू पदम 

वेशभूषा - शोभना मोहरील 

तांत्रिक प्रसिद्ध सहाय्य- मृण्मयी मोहरील विशेष सहाय्य- स्वर मंथन नागपूर.