‘स्वयंसिद्धा लता’ रविवारी

नागपूर : 

सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त सूरसप्तक संस्थेतर्फे ‘स्वयंसिद्धा लता’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २७ सप्टेंबर रोजी सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाची संकल्पना सूरसप्तकच्या अध्यक्ष व गायिका सुचित्रा कातरकर यांची असून निर्मिती कार्याध्यक्ष व गायिका प्रा. पद्मजा सिन्हा यांची आहे. निवेदन वृषाली देशपांडे, तर सूत्रसंचालन प्रा. उज्ज्वला अंधारे करतील.

मुकुल पांडे, डॉ. अमोल कुलकर्णी, आशिष घाटे, धीरज आटे, अरुण ओझरकर, आदित्य फडके, योगेश देशपांडे, अश्विनी लुले, प्रतीक्षा पट्टलवार, डॉ. ऋचा येनुरकर, संगीता भगत, अर्चना उचके, अनुजा जोशी आणि लता पटेल हे गायक कलाकार लता मंगेशकर यांच्या गाजलेल्या गीतांचे सादरीकरण करतील. परिमल जोशी यांच्या संगीत संयोजनात नंदू गोहाणे, पंकज यादव, प्रमोद बावणे, गौरव टांकसाळे आणि तुषार विघ्ने साथसंगत करतील.हा कार्यक्रम नि:शुल्क असून संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.