नागपूर ,

सूरसप्तकच्या १३व्या वर्धापनदिनानिमित्त सूरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या स्मृतींना उजाळा देत ‘स्वयंसिद्धा लता’ या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन २७ सप्टेंबर रोजी सायंटिफिक सभागृहात करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमातून त्यांना स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात सूरसप्तकच्या अध्यक्ष सुचित्रा कातरकर यांच्या ‘सूरस्वामिनी, हृदयी ओंकार रूपिणी...’ या स्वरचित काव्यरचनेने तसेच ‘ये शाम की तनहाइयाँ’ या गीताने झाली. त्यानंतर सूरसप्तकच्या गायकांनी लतादीदींनी गायलेली विविध भावस्पर्शी गीते सादर केली. ‘नैना बरसे’, ‘इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा’, ‘मुझे तुम मिल गये हो’, ‘ये दिल तुमबिन कहीं लगता नहीं’, ‘वो भूली दास्ताँ’ यांसह ३१ एकल व युगल गीतांनी रसिकांची दाद मिळवली. अनेक गीतांना वन्स मोअरची मागणी झाली.

वृषाली देशपांडे यांच्या माहितीपूर्ण व नेटके सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. परिमल जोशी यांच्या संगीत संयोजनाला नंदू गोहाणे, पंकज यादव, प्रमोद बावणे, गौरव टांकसाळे व तुषार विघ्ने यांनी दमदार साथसंगत केली.यापूर्वी सचिव प्रा. उज्वला अंधारे यांनी सूरसप्तकच्या १३ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुचित्रा कातरकर, वर्षा किडे-कुळकर्णी, प्रतिक्षा पट्टलवार व अश्विनी लुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ. अमोल कुलकर्णी व प्रा. पद्मजा सिन्हा यांनी सरस्वती वंदना सादर केली.