1. 'स्वरांगिनी २०२१'  या संगीत संस्थेद्वारे 'कॅनव्हास ऑफ ब्लॅक अँड व्हाईट टाइमलेस मेलोडीज' या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर चौक येथे सायंकाळी  6 ते 9 या वेळेत  संपन्न झाला. कार्यक्रम संकल्पना प्राध्यापक/गायिका पद्मजा  सिन्हा यांची होती. गायक कलाकार अनघा  घोडखांदे व मंगेश भोयर हे संयोजक होते. सुप्रसिद्ध निवेदक श्वेता शेलगावकर यांच्या निवेदनाने मैफिलीत  बहार आणली. 

जुन्या काळातील सदाबहार , सुमधुर कृष्णधवल गीतं गायकांनी सादर केल्याने रसिकांच्या गतस्मृतींना उजाळा मिळाला अन् ते भावविभोर झाले. अनेक गीतं रसिकांची दाद मिळवून गेले. जवा ही मुहब्बत या गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मेरे मेहबूब कयामत, वो दिल कहॉं से लावूँ , दिल की गिरह , अफसाना लिख रही हूँ , मधुबन में राधिका , वो श्याम कुछ अजीब थी, कुहु कुहू बोले , अशी तब्बल ३१ गाणी गायकांनी सादर केली. ईना मिना डिका या सागर  मधुमटके यांनी गायलेल्या गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके यांच्यासह वैशाली पाटील, मैथिली टेंभेकर,  प्रीती कुलकर्णी ,कृष्णा कपूर, पारिजात काळीकर, श्याम बापटे, अभय व्यास   या गायक कलाकारांना  नचिकेत देव ,पंकज यादव, ऋग्वेद पांडे, महेंद्र वाटुळकर, दीपक कांबळे या वादक कलाकारांनी साथसंगत केली. अरुणाई कार्यक्रम प्रायोजक होते. नि:शुल्क प्रवेश* असणाऱ्या या कार्यक्रमास  रसिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.