सोहम संस्थेद्वारे आयोजित गीत सौरभ संगीत ॲकेडमी तर्फे निर्मित *मधुघट* हा कार्यक्रम दि. ४ जुलैला सोहम सभागृहात संपन्न झाला. कविवर्य भा रा तांबेंच्या सुमधुर गीतांवर आधारित या कार्यक्रमाने रसिकांच्या मनाला श्रवणतृप्ततेची अनुभूती दिली.भा. रा तांबेंची अवीट गाणी सुचित्रा कातरकर, पद्मजा सिन्हा, अश्विनी लुले, प्रतिक्षा पट्टलवार, दीपाली पनके मेधा हरिदास, विजय देशपांडे,आर्या देशपांडे,सुवर्ण रेखा पाटील या गायक कलाकारांनी सादर केलीत. त्यांना आर्य पुराणकर,रवी सातफळे, तुषार विघ्ने यांनी साथसंगत केली . भा रा तांबेंच्या कवितांचे वाचन डॉ माधुरी वाघ यांनी केले. यावेळी सुप्रसिद्ध कवयित्री, गायिका सुचित्रा कातरकर यांची मुलाखत अतिशय रंजक झाली. एकंदरीत 'मधुघट' कार्यक्रमाने सोहम संस्थेतील ज्येष्ठ नागरिकांचा 'मधुघट' आनंदाने भरून गेला.
कार्यक्रमाच्या निवेदन व निर्मितीची बाजू गीत सौरभ संगीत ॲकेडमीच्या संस्थापक अध्यक्ष प्रा उज्ज्वला अंधारे यांनी ताकदीने व खुसखुशीतपणे सांभाळली तर संकल्पना सूरसप्तक संगीत संस्थेच्या अध्यक्ष सुचित्रा कातरकर यांची होती. मोहन सरवटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोहम संस्थेच्या अध्यक्ष वर्षा मनोहर व मोहन सरवटे यांचे विशेष सहकार्य लाभले. मेधा हरिदास यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.



